दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर’ का? Trigger-1, 2, 3 म्हणजे काय?

Pradeep Pendhare

दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर’ का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर करताना ‘ट्रिगर-1’ आणि ‘ट्रिगर-3’चा उल्लेख केला. पण हा ट्रिगर नेमका काय आहे?

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

Trigger म्हणजे काय?

‘ट्रिगर’ म्हणजे दुष्काळाची धोक्याची सूचना देणारा शासकीय निकष आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे का, हे ठरवण्यासाठी विविध वैज्ञानिक आणि प्रशासकीय घटक तपासले जातात. Trigger-1 हा या प्रक्रियेतील सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा आहे.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

Trigger-1 कधी लागू होतो?

पाऊस कमी पडणे किंवा पावसाचा मोठा खंड पडल्यास Trigger-1 लागू होतो. शासकीय निकषांनुसार मान्सून काळात 75% पेक्षा कमी पाऊस किंवा प्रदीर्घ पावसाचा खंड आढळल्यास Trigger-1 लागू होऊ शकतो.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

Trigger-1 म्हणजे दुष्काळ जाहीर?

Trigger-1 म्हणजे दुष्काळ जाहीर झाला असे होत नाही. यानुसार दुष्काळाची पहिली धोक्याची सूचना दिली जाते. त्यानंतर परिस्थितीचे पुढील मूल्यांकन केले जाते.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

Trigger-2 मध्ये काय?

या परिस्थितीमध्ये फक्त पाऊस पाहिला जात नाही! तर Trigger-2 मध्ये परिस्थितीचे अधिक व्यापक मूल्यांकन केले जाते. भूजल पातळी, जमिनीतील ओलावा, पेरणीची स्थिती आणि पिक संकटाचे निर्देशांक यांसारख्या बाबींचा विचार होतो.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

Trigger-3 का महत्त्वाचा?

यादीतून सुटलेल्या भागांसाठी ‘Trigger-3’ महत्त्वाचा ठरते. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्यानुसार, सध्याच्या दुष्काळग्रस्त यादीत नसलेल्या काही तालुक्यांचीही परिस्थिती तपासली जाणार असून, गरज असल्यास Trigger-3 अंतर्गत त्यांचा समावेश केला जाईल.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

2026 मध्ये Trigger-1 चा परिणाम?

26 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यात 1 जून ते 26 सप्टेंबरदरम्यान सामान्य 970.9 मिमीच्या तुलनेत 798.2 मिमी पाऊस झाला, म्हणजे 18% तूट नोंदली गेली.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

शेतकऱ्यांना काय मिळणार?

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर परिस्थितीनुसार विविध सवलती आणि उपाययोजना लागू होतात. यात पिक नुकसानीचे पंचनामे, कर्ज पुनर्रचना, जमीन महसूल सवलत/माफी, कृषीपंपाच्या वीजबिलाबाबत सवलत, पाणीपुरवठ्याचे नियोजन होते.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

एक महत्त्वाचा गैरसमज

Trigger-1 प्रत्येक शेतकऱ्याला लगेच रोख मदत असे सरळ समीकरण लावले जाते. पण तसे काही होत नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही दुष्काळा संबंधित शासकीय प्रक्रिया होते. नुकसानीचे मूल्यांकन होऊन आर्थिक मदतीचा निर्णय होतो.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

ट्रिगर म्हणजे दुष्काळाची घंटा!

Trigger-1 प्राथमिक धोक्याची सूचना, Trigger-2 परिस्थितीचे सखोल मूल्यांकन आणि Trigger-3 अतिरिक्त/सुटलेल्या भागांचा आढावा.

Maharashtra Drought Trigger | Sarkarnama

NEXT : Form 6 असा भरा

येथे क्लिक करा :