Pradeep Pendhare
'अ' वर्ग नगरपालिका थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 15 लाख, तर सदस्य पदाच्या उमेदवाराला पाच लाख रुपयांची खर्च मर्यादा असेल.
'ब' वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 11 लाख 25 हजार, तर सदस्य पदाच्या उमेदवाराला साडेतीन लाख रुपये खर्च मर्यादा असेल.
'क' वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला साडेसात लाख, तर सदस्य पदाच्या उमेदवाराला अडीच लाख रुपये खर्च मर्यादा असणार आहे.
नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा लाख, तर सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार रुपये मर्यादा घातली आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, अशा 'अ' वर्ग महापालिकांसाठी 15 लाख खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.
नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, अशा 'ब' वर्ग महापालिकांसाठी 13 लाख रुपये खर्च मर्यादा असणार आहे.
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार, अशा 'क' वर्ग महापालिकांसाठी 11 लाख रुपये खर्च मर्यादा घालण्यात आली आहे.
उर्वरीत 19 'ड' वर्ग महापालिकांसाठी नऊ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने ही खर्च मर्यादेत तब्बल आठ वर्षांनी वाढ केली आहे.