Rajanand More
भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी Special Intensive Revision- SIR ही प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक मतदाराची पडताळणी करून नवी यादी प्रसिध्द केली जाते.
आयोगाने यावर्षी बिहारमध्ये या प्रक्रियेचा पहिला टप्पा राबविला. त्यावरून बराच वादही झाला. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहचले. त्यानंतर आता आयोगाने संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली आहे.
आयोगाकडून पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगढ, गोवा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये दुसरा टप्पा राबविला जाईल.
सुरूवात 4 नोव्हेंबरपासून होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी 12 राज्यांमध्ये अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द केल्या जातील.
12 राज्यांमधील सध्याच्या मतदारयाद्या ता. 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोठविल्या जातील. त्यानंतर 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधी छपाई व प्रशिक्षण होईल.
ता. 4 नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी. त्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. प्रत्येक घरी तीनवेळा अधिकारी जातील. त्यानंतर. 9 डिसेंबरला तात्पुरती यादी प्रसिध्द होईल.
प्रक्रियेसाठी 5.33 लाख बूथ लेव्हल अधिकारी (BLO) आणि 7.64 लाख राजकीय पक्षांचे बूथ एजंट (BLA) असतील. त्यांच्यामार्फत मतदारांपर्यंत पोहचले जाईल.
SIR मध्ये 12 राज्यांतील तब्बल 51 कोटी मतदारांची पुनर्पडताळणी केली जाणार आहे. त्यामध्ये नवे मतदार वाढू शकतात आणि दुबार नावे, मृत मतदार, बोगस मतदारांची नावे वगळली जातील.