आयोगात मतभेदाचे आरोप, 'या' IAS अधिकाऱ्याने घेतला नोकरी सोडण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

Rajanand More

IAS गोपालन

ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच CEO आर. एस. गोपालन यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज त्यांनी ३० सप्टेंबर रोजी दिला आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

२५ वर्षे सेवा

गोपालन हे २००१ च्या तुकडीचे IAS अधिकारी असून विविध पदांवर २५ वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयाने चर्चांना उधाण आले आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

SIRचा वाद

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमधील कथित मतभेदांचा मुद्दा चांगलाचा तापला आहे. विरोधकांकडून एसआयआरवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

ओडिशातही आरोप

ओडिशामध्येही एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून बिजू जनता दल व काँग्रेसने लाखो मतदार वगळल्यावरून आयोगावर निशाणा साधला आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

SIRशी संबंध नाही

SIR प्रक्रियेवरून निर्माण झालेला वाद, विरोधकांचा आरोप याचा आपल्या स्वेच्छानिवृत्तीशी काही संबंध नसल्याचे गोपालन यांनी सांगितले आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

कारण काय?

स्वेच्छानिवृत्तीमागे वैयक्तिक कारण असल्याचे गोपालन यांनी म्हटले आहे. सरकारी सेवेला २ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

IAS R S Gopalan | Sarkarnama

कार्यकाळ

गोपालन हे जून २०२८ मध्ये नियमितपणे सेवानिवृत्त होणार होते. मात्र, राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडाभरातच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला.

IAS R S Gopalan | Sarkarnama

चर्चांना उधाण

स्वेच्छानिवृत्तीच्या गोपालन यांच्या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहेत. सोशल मीडियातही त्याची बरीच चर्चा होत असून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

IAS R S Gopalan | Sarkarnama

NEXT : भाजपला हादरा देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार; अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसोबत

येथे क्लिक करा.