केंद्रीय निवडणूक आयोगाचा इतिहास : राजीव गांधी ते नरसिंह राव सरकारचे निर्णय

Jagdish Patil

निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोग सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर आयोगाची स्थापना कधी आणि कशी झाली, हे जाणून घेऊया.

Election Commission of India | Sarkarnama

स्थापना

आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आणि त्याच्याकडे लोकसभा, विधानसभांसह राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी दिली

election commission of india

बदल

सुरुवातीला आयोगाचा कारभार एकाच मुख्य निवडणूक आयुक्तांकडे होता. मात्र, कालांतराने आयोगाच्या रचनेत बदल झाले.

Election Commission of India | Sarkarnama

नियुक्ती

सध्या आयोगात एक मुख्य आणि दोन निवडणूक आयुक्त आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती ६ वर्षांच्या कार्यकाळासाठी करतात.

Gyanesh Kumar | Sarkarnama

कामकाज

स्थापनेपासून ४ दशके निवडणूक आयोगाचे कामकाज एकाच मुख्य निवडणूक आयुक्तांमार्फत चालत होते.

Election Commission of India | Sarkarnama

राजीव गांधी

१९८९ मध्ये राजीव गांधी सरकार आणि तत्कालीन मुख्य आयुक्तांमधील मतभेदांनंतर आयोगात २ अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली.

rajiv gandhi | sarkarnama

एस. एस. धनुआ

१६ ऑक्टोबर १९८९ रोजी एस. एस. धनुआ आणि व्ही. एस. सेगेल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.

Election Commission of India

अधिसूचना

व्ही. पी. सिंह सरकारने १९८९ मधील अधिसूचना रद्द केल्याने निवडणूक आयोग पुन्हा एकसदस्यीय झाला.

Election Commission of India | Sarkarnama

याचिका

पदावरून हटवलेल्या धनुआ यांनी सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.

Supreme Court | Sarkarnama

टी. एन. शेषन

१९९१ मध्ये आयुक्तांच्या सेवाशर्तींचा कायदा संमत झाला. डिसेंबर १९९० मध्ये टी. एन. शेषन यांनी मुख्य आयुक्तपद स्वीकारून आयोगाच्या स्वायत्ततेसाठी ठाम भूमिका घेतली.

T N Seshan,

नरसिंह राव

१९९३ मध्ये नरसिंह राव सरकारने आयोग ३ सदस्यीय करून तिन्ही आयुक्तांना समान अधिकार दिले.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

तीन सदस्य

टी. एन. शेषन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने १४ जुलै १९९५ रोजी फेटाळली. तेव्हापासून आयोग ३ सदस्यीय आहे.

T N Seshan | Sarkarnama

NEXT : जमावबंदी आणि संचारबंदीमध्ये नेमका फरक काय? नियम मोडल्यास काय होते?

Prohibitory Orders and Curfew | Sarkarnama
क्लिक करा