Pradeep Pendhare
राहुल गांधी यांनी 'व्होट चोरी'चा मुद्दा देशभर गाजत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्चचिन्ह निर्माण झाली आहेत.
राहुल गांधींच्या पाठोपाठ सत्ताधारी देखील 'व्होट चोरी'च्या मुद्यावर भाष्य करत असल्याने मतदार याद्यांवरून बराच संघर्ष सुरू आहे.
निवडणूक आयोगाने पुढील आठवड्यापासून देशातील 10 ते 15 राज्यांमध्ये मतदार याद्यांचे 'एसआयआर' करणारचं नियोजन केलं आहे.
पहिल्या टप्प्यात आसाम, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी या राज्यांच्या मतदार याद्यांची छाननी होईल.
'एसआयआर' करताना अधिसूचना जारी होईल. त्यानंतर राज्यांना वेळपत्रक दिले जाणार आहे.
मतदार यादीच्या छाननीसाठी जिल्हा-बूथस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यादीची पडताळणी करताना, बूथस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देतील आणि मृत, स्थलांतरीत आणि बनावट नावे शोधतील.
नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणे, दुरुस्ती किंवा स्थलांतरीत मतदारांची नावांवर मतदार यादीत कार्यवाही होईल.
नियोजित वेळी हरकती स्वीकारल्या जातील, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल.
काही राज्यांमध्ये 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तिथं पहिला कार्यक्रम राबविला जाईल.