Jagdish Patil
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची गुंतवणूक योजना आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक यात गुंतवणूक करू शकतात.
या योजनेत 1,000 रुपयांपासून ते 30 लाखांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी व्याजदर 8.2% निश्चित करण्यात आला आहे.
SCSS चा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ मिळतो.
दर तिमाहीत गुंतवणूकदाराच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाते. हे पैसे ताबडतोब वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे उत्पन्नाचा आधार मिळतो.
या योजनेचा म्यॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, मात्र, तो आपल्या इच्छेनुसार आणखी 3 वर्षांनी वाढवता येतो. तसंच मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी दंडही आहे.
एक वर्षात काढलेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही. 1 ते 2 वर्षांच्या दरम्यान काढलेल्या रकमेवर 1.5 % आणि 2 ते 5 वर्षांच्या दरम्यान काढलेल्या रकमेवर 1% कपात केली जाते.
या योजनेसाठी पती-पत्नी संयुक्त खाते काढू शकतात. यामुळे गुंतवणूक मर्यादा आणि व्याज दोन्ही वाढते, ज्यामुळे कुटुंबाला अधिक आर्थिक सुरक्षा मिळते.