Jagdish Patil
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ गुरुवारी (27 जून) रोजी संपला.
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल जाते ते विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अब्दुल्ला बाबाजानी खान दुर्राणी यांचाही कार्यकाळ संपला.
भाजपचे निलय नाईक यांच्या नावाची नुकत्याच झालेल्या लोकसभेसाठी चर्चा सुरु होती. मात्र, हा मतदारंघ शिंदे गटाकडे गेल्यामुळे चर्चा पुढे सरकली नाही. त्यांचाही विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार अशी ओळख असणारे अनिल परब यांचाही विधान परिषदेचा कार्यकाळ गुरुवारी संपतोय.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि नुकतेच परभणी लोकसभा मतदार संघातून पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचाही कार्यकाळ संपला.
काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ गुरुवारी (ता.27) संपत आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.
विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आमदाराच्या नावे आरटीओकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार वजाहत मिर्झा यांची चौकशी करण्यात आली होती. मिर्झा यांचाही कार्यकाळ संपत आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यांसह विधानपरिषद सदस्य, विजय विठ्ठल गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील यांचाही कार्यकाळ संपला आहे. अशा एकूण 11 सदस्यांचा कार्यकाळ आज संपला आहे.