Roshan More
लोकसभा सदस्याची शपथ घेताना एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवीसी यांनी जय पॅलेस्टीन घोषणा दिली. दुसऱ्या देशाची घोषणा दिल्याने ते अपात्र ठरण्याच्या चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे असुद्दीन ओवीसी यांच्या घोषणेवर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 102 नुसार संसद सदस्यांना त्यांच्या वर्तनामुळे अपात्र ठरवता येते.
जर लोकसभा सदस्याला न्यायालयाने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ घोषित केले. तर तो लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरतो.
भारतीय नागरिक असताा स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर लोकसभा सदस्य अपात्र ठरतो.
काही गुन्हे आणि भ्रष्ट व्यवहारांसाठी न्यायालयाने दोषी ठरवल्यास तसेच शिक्षा केल्यास अपात्र ठरवले जाते.
भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत संसदेच्या परवानगी शिवाय कोणतेही लाभाचे पद सदस्याने घेतले तर त्याला अपात्र ठरवण्यात येते.
10 व्या अनुसूचीनुसार सदस्याने आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याला अपात्र ठरवले जाते.