Rajanand More
राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत बॉण्डची विक्री केली जात होती. ही माहिती गोपनीय असल्याने सुप्रीम कोर्टाकडून योजना रद्द.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बॉण्डच्या विक्रीची माहिती प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये कुणी किती देणगी दिली, कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली याची माहिती.
भाजपला सर्वाधिक 6 हजार 986 कोटी रुपयांची देणगी. त्याखालोखाल तृणमूल काँग्रेसला 1 हजार 387 कोटी रुपये मिळाले.
प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर. काँग्रेसला 1 हजार 334 कोटी देणगी. चौथ्या क्रमांकावर बीआरएस (1 हजार 322 कोटी).
डीएमके, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनाही मोठी देणगी. बीजेडीला 944 तर डीएमकेला 656 कोटी मिळाले.
देशातील 22 प्रादेशिक पक्षांना 5 हजार 221 कोटींची देणगी. भाजपपेक्षा 839 कोटी कमी मिळाले.
रोख्यांची सर्वाधिक खरेदी लॉटरी किंग सँटियागो मार्टिनचे फ्यूचर गेमिंगने 1 हजार 368 कोटींचे बॉण्डची खरेदी केली होती.