Pradeep Pendhare
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क बर्याचदा मोठमोठे दावे करून सर्वांना चकीत करतात.
आपल्या संपूर्ण जीवनात 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक टॅक्स भरेन, असा मस्क यांनी दावा केला आहे.
एलन मस्क यांनी अंदाज वर्तवला आहे की, त्यांची एकूण संपत्ती 852 अब्ज डॉलरच्या पार गेली आहे.
स्पेसएक्स रॉकेट आणि आर्टिफिशल इंटेलिजंट कंपनी ‘एक्सएआय’चे विलिनीकरण झाल्यापासून एलन मस्क यांच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे.
विलिनीकरणानंतर कंपनीचे मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर झाले असून, आतापर्यंत 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक टॅक्स भरला आहे.
एलन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असून, या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांच्या नेट वर्थमध्ये एका दिवसात 84 अब्ज डॉलरची वाढ झाली.
दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या कंपनीमध्ये मस्कची एकूण भागेदारी 43 टक्के असून, भागेदारी 542 अब्ज डॉलर एवढी आहे.
एलन मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचा 12 टक्के भाग असून त्याचे मूल्य 178 अब्ज डॉलर आहे.