Jagdish Patil
माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांचे सोमवारी (ता.२३) निधन झालं.
त्यांच्या निधनाने बंगालच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
CM ममता बॅनर्जींचे विश्वासू आणि बंगालच्या राजकारणातील 'चाणक्य' मानलं जाणाऱ्या रॉय यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ.
जानेवारी 1998 मध्ये अस्तित्वात आलेल्या तृणमूल काँग्रेसचे रॉय हे संस्थापक सदस्य होते.
एकेकाळी ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते. त्यांनी TMC चं सरचिटणीस पद भुषवलं होतं.
TMC कडून ते राज्यसभेवर गेले 2009 ते 2012 पर्यंत त्यांनी राज्यसभेत पक्षाचं नेतृत्व केलं.
UPA सरकारमध्ये, त्यांनी सुरुवातीला जहाजबांधणी राज्यमंत्री तर मार्च 2012 मध्ये रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला18 जागा मिळाल्या.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांनी लगेचच तृणमूलमध्ये 'घरवापसी' केली.