Rajanand More
Elon Musk यांची स्टारलिंक ही कंपनी जगभरात प्रसिध्द आहे. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीची सेवा भारतात लॉन्च होणार असल्याची चर्चा होती. अखेर ती प्रतिक्षा संपली आहे.
कंपनीच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेचे प्लॅन आता समोर आले आहेत. पण हे प्लॅन लोकांना परवडणारे असतील का, याबाबत उत्सुकता आहे. पण असे अजिबात नाही.
सर्वसामान्यांसाठी ही सेवा महागडी ठरणारी आहे. स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटनुसार, भारतात या सेवेचा सुरूवातीचा मासिक प्लॅनच ८६०० रुपये एवढा आहे.
सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक हार्डवेअर किटसाठीही ग्राहकांना वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी तब्बल ३४ हजार रुपये द्यावे लागतील.
कंपनीने दावा केला आहे की, इंटरनेट सेवेमध्ये कसलाही अडथळा येणार नाही. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या सेवाचा वापर करता येऊ शकतो. सध्यातही हा वापर काही मोजक्या ठिकाणी असेल.
कंपनीकडून ३० दिवसांची ट्रायल दिली जाणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळेल. या काळात इंटरेनेटची चाचपणी करता येईल.
या प्लॅनअंतर्गत ग्राहक अँटेना किट आपल्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतात. पण भारतात ही सेवा उपलब्ध असेल की नाही, याबाबत स्पष्टता नाही. इतर देशात ही सेवा दिली जाते.
स्टारलिंक इंडिया कंपनीच्या वेबसाईटवर सेवेचे प्लॅन व उपलब्धता पाहू शकता. वेबसाईटवर लोकेशनुसार वेगवेगळे प्लॅन व ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.