Rajanand More
जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. श्रीमंतीचे सर्व रेकॉर्ड त्यांनी मोडले आहेत.
मस्क यांनी बुधवारी (ता. 1 ऑक्टोबर) संपत्तीचा तब्बल 500 अब्ज डॉलरचा टप्पा गाठत विक्रम केला आहे. एवढी संपत्ती असलेले ते जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत.
फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलेयनेयर्स लिस्टमध्ये मस्क यांनी पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये मस्क यांनी संपत्ती 500.1 अब्ज डॉलर बनल्याचे म्हटले आहे.
तीन कंपन्यांच्या नफ्यामुळे मस्क यांना हा टप्पा गाठता आला आहे. त्यामध्ये टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सएआय या कंपन्यांचा समावेश आहे.
टेस्ला कंपनीच्या शेअर्सनी यावर्षी 14 टक्के अधिक कमाई मिळवून दिली आहे. केवळ बुधवारी त्यात 3.3 टक्क्यांची वाढ झाली. तर संपत्ती ६ अब्ज डॉलरने वाढली. मस्क यांच्याकडे टेस्लामध्ये 12.4 टक्के भागीदारी आहे.
स्पेसएक्स ही मस्क यांची रॉकेट कंपनी आहे. या कंपननीच ऑगस्ट 2025 मधील मूल्य तब्बल 400 अब्ज डॉलर एवढे होते. मस्क यांच्याकडे या कंपनीचे 42 टक्के समभाग आहेत.
एक्सएआय या कंपनीमध्ये मस्क यांची सर्वाधिक 53 टक्के भागीदारी असून या कंपनीचे मूल्य 113 अब्ज डॉलरहून अधिक आहे.
टेस्ला कंपनीने मस्क यांच्यासाठी एक हजार अब्ज डॉलरच्या नफ्याचे टार्गेट ठेवले आहे. त्याअनुषंगाने कंपनीचा जगभरात विस्तार करण्याचे धोरण आहे.