Rashmi Mane
इलॉन मस्क आता X या सोशल मीडिया अॅपमध्ये डिजिटल पेमेंट फीचर आणत आहेत. हे अॅप आता केवळ सोशल मीडिया नाही, तर ‘सुपरअॅप’ बनणार आहे.
X Money हे X अॅपमधील नवं पेमेंट फीचर आहे. यामुळे वापरकर्ते अॅपमधूनच पैसे पाठवू, मिळवू आणि बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतील.
हा फीचर सध्या फक्त निवडक बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने टेस्टिंग सुरू आहे.
X Money द्वारे भविष्यात बिटकॉइनसारखी क्रिप्टो करंसी खरेदी करणं शक्य होणार आहे. यामुळे हे फीचर खूपच इनोव्हेटिव्ह ठरेल.
वापरकर्ते X Money वॉलेटमध्ये व्हिसा किंवा डेबिट कार्ड जोडू शकतील. त्यातून P2P पेमेंट्स सहज करता येतील.
हे फीचर GPayप्रमाणेच कॉन्टॅक्टलेस पेमेंटची सुविधा देईल. मोबाईल टच करूनही पेमेंट होणार! इलॉन मस्क X ला केवळ अॅप नव्हे, तर एकाच ठिकाणी सर्व सुविधा असलेलं सुपरअॅप बनवू इच्छितात.
ही सेवा 2025 च्या अखेरीस सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
X अॅप आता केवळ पोस्ट्स आणि व्हिडिओंसाठी नाही, तर डिजिटल व्यवहारांसाठी देखील वापरलं जाणार त्यामुळे ही एक डिजिटल क्रांती ठरेल हे नक्की.