Mangesh Mahale
शर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांचे बालपण व शिक्षण धुळ्यात झाले.
एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते एमपीएससी करून पोलिस दलात दाखल झाले.
त्यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकपदावर झाली होती.
एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती, त्यांचा ३१२ एन्काउंटरमध्ये सहभाग होता.
लष्कर- ए-तोयबाच्या अतिरेक्यांसह १०० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर शर्मा यांनी केले.
दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून शर्मा हे एन्काउंटर करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब प्रकरणात शर्मा यांचे नाव आले होते.
मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे.
शर्मा यांनी नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून विधानसभा लढवली होती. यात त्यांना अपयश आले होते.
शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात एन्ट्री केली होती.