IAS Supriya Sahu: पर्यावरणप्रेमी IAS ने केला विश्वविक्रम ! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक सुप्रिया साहू

सरकारनामा ब्यूरो

सुप्रिया साहू

1989 बॅचच्या सुप्रिया साहू या उत्तर प्रदेशच्या आहेत. लहानपणापासूनच त्या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

स्मार्ट IAS

हुशारीने आणि तर्काने केलेल्या स्मार्ट कामाने साहू यांना नेहमीच यश मिळत गेले.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

शिक्षण

लखनौ विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आणि बॉटनी विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

तामिळनाडूच्या कार्यकारी अवर सचिव

पहिली पोस्टिंग तामिळनाडू केडरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून होती. नंतर तिथेच मुख्य कार्यकारी अवर सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक

त्या एक पर्यावरण कार्यकर्त्या असून त्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवला आहे.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

लोकप्रिय अन् पर्यावरणप्रेमी

साहू या एक लोकप्रिय पर्यावरणप्रेमी अधिकारी आहेत ज्यांनी तमिळनाडूच्या निलगिरीची देखरेख केली.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

ऑपरेशन ब्लू माऊंटन

जिल्ह्यातील प्लास्टिक बंदीसाठी त्यांनी ऑपरेशन ब्लू माऊंटन सुरू केले. या कामाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

साहू यांच्या प्रयत्नांमुळे निलगिरीतील नद्या आणि झरे स्वच्छ झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली 42 हजारांहून जास्त झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

विविध पदे भूषवली

सुप्रिया साहू यांनी प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडत विविध पदे भूषवली आणि समाजकल्याणासाठी कायम कार्य करत आहेत.

IAS Supriya Sahu | Sarkarnama

Next : आमदार फरांदेंनी अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी; नेमकं काय घडलं ?

येथे क्लिक करा