Ganesh Thombare
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आज रस्त्यावर उतरल्या होत्या.
अतिक्रमणाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची फरांदेंनी खरडपट्टी काढली.
आमदार फरांदेंकडे बेकायदेशीर धंदे सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
नाशिक महापालिकेला तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नव्हती.
देवयानी फरांदेंनी आता अनाधिकृत बांधकामांवर धडक मोहीम सुरु केली.
बेकायदेशीर अतिक्रमण होताना पालिकेचे अधिकारी काय करतात ? असा प्रश्न त्यांनी केला.
या मोहिमेमुळे आमदार देवयानी फरांदे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार फरांदेंनी दिल्या.