Rashmi Mane
EPFO 3.0 लवकरच होणार लाँच त्यामुळे 8 कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा फायदा!
PF पैसे काढण्यासाठी Form-31, 19, 10C, 10D भरावे लागतात आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतात. काही वेळा ऑफिसमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
कर्मचाऱ्यांना अनेकदा रांगा व कागदपत्रांची धावपळ करावी लागते.
आता PF काढणे होईल सोपे, काही सेकंदांत होईल काम.
PF पैसे थेट ATM मधून काढता येतील. किंवा UPI द्वारे देखील व्यवहार शक्य होईल.
यासाठी आधार आधारित ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. सरकार यासाठी लिमिट ठरवणार आहे.
EPFO आल्यावर काही सेकंदांत पीएफ पैसे मिळतील, ऑफिसला जाण्याची गरज नाही. डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार तसेच कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय गेम-चेंजर ठरणार आहे.
EPFO 3.0 आधी जूनमध्ये लाँच होणार होतं पण तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला आहे.
त्यामुळे आता दिवाळीपूर्वी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.