कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! नोकरी बदलली तरी 'पीएफ'ची चिंता संपली...

Rajanand More

काय आहे नियम?

कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर त्याचा जमा झालेला पीएफ लगेच ट्रान्सफर होणार नाही; नवीन कंपनीचा पहिला पीएफ हप्ता जमा झाल्यावरच ऑटो ट्रान्सफर सुरू होईल.

PF balance check

अर्ज करावा का?

UAN आधारशी लिंक आणि KYC पूर्ण असल्यास स्वतंत्र पीएफ ट्रान्सफर अर्ज करण्याची गरज नाही.

PF balance check

ऑटोमॅटिक ट्रान्सफर

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आधार-लिंक UAN असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरची घोषणा केली आहे.

PF balance check

मंजुरी गरजेची नाही

EPFO च्या या नव्या प्रणालीमुळे जुन्या व नव्या कंपनीची पीएफ ट्रान्सफरसाठी मंजुरी आणि स्वतंत्र ट्रान्सफर अर्जाची आवश्यकता नसेल.

PF balance check

UAN कायम एकच

UAN नोकरीच्या संपूर्ण कालावधीसाठी कायम राहील आणि सर्व पीएफ खाती त्याच क्रमांकाशी आपोआप जोडली जाणार आहेत.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

कामकाज सुलभ

एकाच UAN अंतर्गत सर्व पीएफ खाती जोडल्यास संपूर्ण कालावधीतील सेवेची माहिती, पीएफ प्रगत, अंतिम सेटलमेंट आणि पेन्शनचे दावे आदी कामे सुलभ होऊ शकतील.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

सर्व नोंदी उपलब्ध

ऑटो ट्रान्सफर प्रणालीमुळे काही सेवा तात्पुरत्या स्वरुपात विलंबाने होऊ शकतात. मात्र कर्मचारी EPFO पोर्टलवरील 'Service History' मध्ये याबाबतच्या सर्व नोंदी पाहू शकतील.

EPF योजना

सध्या EPF योजनेत कर्मचारी आणि कंपनी दोघेही १२-१२ टक्के रक्कम जमा करतात; २०२५-२६ साठी व्याजदर ८.२५ टक्के एवढा आहे. त्यामध्ये बदलही होतो.

NEXT : IPS अधिकाऱ्याकडून वकिलासह आंदोलकांना मारहाण; सरकारची डोकेदुखी वाढविणारे 'हे' अधिकारी कोण?

येथे क्लिक करा.