PF चे अपडेट्स आता थेट तुमच्या WhatsApp वर! जाणून घ्या ही खास ट्रिक

Rashmi Mane

PF चे अपडेट्स आता WhatsApp वर!

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! EPFO च्या WhatsApp चॅनेलवरून PF, पेन्शन आणि सरकारी योजनांशी संबंधित अपडेट्स मिळवता येतात. जाणून घ्या चॅनेलला जोडण्याची सोपी पद्धत.

EPFO | sarkarnama

PF ची माहिती मिळवणं सोपं

पगारातून दर महिन्याला PF जमा होतो. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे नियम आणि अपडेट्स माहीत नसतात. WhatsApp चॅनेलमुळे महत्त्वाची माहिती मिळवणं सोपं होतं.

EPFO | Sarkarnama

कोणते अपडेट्स मिळणार?

EPF, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि EDLI विमा योजनेशी संबंधित माहिती या चॅनेलवर मिळू शकते.

EPFO | Sarkarnama

सरकारी निर्णयांची माहिती

PF संदर्भातील महत्त्वाचे निर्णय, योजनांमधील बदल, अंतिम मुदती आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या उपक्रमांची माहितीही येथे मिळू शकते.

EPFO | Sarkarnama

तक्रार निवारणाची माहिती

EPFO कडून आयोजित तक्रार निवारण शिबिरांची माहिती आणि PF प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडिओही कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतात.

EPFO | Sarkarnama

WhatsApp चॅनेल कसं फॉलो कराल?

EPFO च्या अधिकृत WhatsApp चॅनेलची लिंक उघडा. त्यानंतर WhatsApp वरील ‘Follow’ पर्यायावर क्लिक करा. अपडेट्स ‘Updates’ विभागात पाहता येतील.

EPFO | Sarkarnama

WhatsApp वरून PF काढता येतो?

लक्षात ठेवा, WhatsApp चॅनेल हे केवळ माहिती मिळवण्याचं माध्यम आहे. येथून PF बॅलन्स तपासता येत नाही किंवा पैसे काढण्याचा क्लेम दाखल करता येत नाही.

EPFO | Sarkarnama

PF साठी अधिकृत पर्याय कोणते?

PF बॅलन्स, क्लेम आणि पेन्शनसंबंधी व्यवहारांसाठी EPFO चं अधिकृत पोर्टल किंवा UMANG अॅप वापरा. फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

EPFO | Sarkarnama

Next : शाळा प्रवेशाचे नियम बदलले, नर्सरी ते पहिली कोणत्या वर्गासाठी किती वय हवे..? 

येथे क्लिक करा