Aslam Shanedivan
नोकरदार आणि 'ईपीएफओ' सदस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (EPFO) नवे नियम लागू केले आहेत.
PF खात्यातून पैसे काढण्यासह क्लेम सेटलमेंट आणि ई-नॉमिनेशन संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या नवीन नियमांनुसार, आता पीएफ क्लेम झटक्यात आणि सहज होण्यासाठी सदस्यांना काही तांत्रिक अटी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे.
यामुळे जर PF खाते अपडेट नसेल किंवा ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर PF क्लेम फेटाळला जाऊ शकतो.
PF क्लेम करण्यासाठी EPFO नवे नियम लागू करत अत्यावश्यक गरजा, कौटुंबिक गरजा आणि विशेष परिस्थिती अशा 3 सोप्या श्रेणी तयार केल्या आहेत.
तर PF क्लेम करताना 75% पर्यंतच रक्कम काढता येणार असून 25% रक्कम ही निवृत्तीनंतरच्या सुरक्षेसाठी ठेवावी लागणार आहे.
PF चा क्लेम हा वैद्यकीय किंवा पैसे काढण्यासाठी असल्यास किमान 1 वर्ष नोकरी पूर्ण झालेली असणे गरजेचं आहे. तर नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागेल.
PF खात्याला वारसदार जोडणे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून ती अनिवार्य करण्यात आली आहे.
EPFO नवे नियम करताना PF क्लेम पास करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी बंधनकारक केला आहे.