EPFO Rules : तुमचं लग्न ठरलंय? मग PF मध्ये जमा केलेली पैसे 'असे' काढता येईल; वाचा नियम

Rashmi Mane

EPFOमध्ये मोठा बदल!

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातील रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता लग्नासारख्या वैयक्तिक कारणांसाठी 100% रक्कम काढण्याची मुभा मिळाली आहे.

Marriage | Sarkarnama

लग्नासाठी पूर्ण PF रक्कम!

आता तुम्ही स्वतःचे, मुलांचे किंवा भाऊ-बहिणींच्या लग्नासाठी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकता. भारतात लग्नावर होणारा 5 ते 20 लाखांचा खर्च लक्षात घेता हा निर्णय अनेकांसाठी दिलासा देणारा आहे.

Marriage | Sarkarnama

आधी फक्त 3 वेळा, आता 5 वेळा

पूर्वी गरजेच्या प्रसंगी PF मधून पैसे काढण्याची मर्यादा केवळ 3 वेळा होती.
नवीन नियमांनुसार PF खातेदार 5 वेळा अशी रक्कम काढू शकतील.

EPFO | Sarkarnama

25% रक्कम ठेवणे अनिवार्य

100% रक्कम काढण्याची मुभा असली तरी खात्यात किमान 25% रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरून खाते सक्रिय राहील आणि त्यावर व्याज मिळत राहील.

EPFO | Sarkarnama

सेवाकालाची नवी अट

या रक्कमेसाठी किमान 5 वर्षे नोकरी आवश्यक होती. आता हा काळ फक्त 12 महिने केला आहे. म्हणजेच एका वर्षाच्या सेवेनंतरही लग्न, शिक्षण, घर किंवा उपचारासाठी PF अॅडव्हान्स मिळू शकतो.

EPFO | Sarkarnama

PF मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

PF काढण्यासाठी EPFO च्या वेबसाइटवर जा:
unifiedportal-mem.epfindia.gov.in
तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा भरून Login करा.

EPFO | Sarkarnama

Online Services वर क्लिक

Login केल्यानंतर ‘Online Services’ वर क्लिक करा, त्यानंतर ‘Claim Form – 31, 19, 10C & 10D’ हा पर्याय निवडा.

EPFO | Sarkarnama

Marriage निवडा आणि डॉक्युमेंट अपलोड

Form 31 निवडा आणि ड्रॉपडाउनमध्ये Marriage हा पर्याय क्लिक करा. लग्नाचं निमंत्रण पत्र स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर नियम स्वीकारून अर्ज सबमिट करा.

New EPFO rule | Sarkarnama

काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण

तुमचा अर्ज ऑनलाइन सबमिट होताच EPFO कडून तपासणी केली जाते. सर्व माहिती बरोबर असल्यास PF रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. लग्नासारख्या मोठ्या खर्चासाठी ही सुविधा खूप उपयोगी ठरणार आहे.

EPFO | Sarkarnama

Next : एका मताने काय होते? इतिहास वाचा अन् मतदान नक्की करा!

येथे क्लिक करा