Jagdish Patil
कोट्यवधी नोकरदारांसाठी पीएफशी संबंधित कामे आता अधिक सोपी होणार आहेत.
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी दोन मोठे निर्णय घेतलेत.
त्यानुसार आता पीएफशी संबंधित विविध सेवा WhatsApp वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आणि एक हजार रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या जुन्या खात्यांचे ऑटोमेटिक सेटलमेंट केले जाणार आहे.
EPFO ची WhatsApp सेवा वापरण्यासाठी QR कोड स्कॅन करून चॅटबॉटशी जोडता येणार आहे.
QR कोड स्कॅन करायचा नसल्यास +918796441800 हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करूनही सेवा वापरता येईल.
WhatsApp सेवा सुरू केल्यानंतर सर्वप्रथम भाषेची निवड करता येईल त्यानंतर चेक बॅलन्स, शेवटचे व्यवहार, पासबुक डाऊनलोडचे पर्याय दिसतील.
डिजिटल युगात सदस्यांशी सहज संपर्क साधण्यासाठी EPFO कडून WhatsAppचा वापर केला जात आहे.
या सुविधेमुळे खातेधारकांना आवश्यक सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सोपे आणि थेट माध्यम उपलब्ध झाले आहे.