Rashmi Mane
PF मधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. EPFO लवकरच अशी सुविधा आणत आहे, ज्यामुळे सदस्यांना थेट UPI आणि ATM च्या मदतीने पैसे मिळू शकतील.
आतापर्यंत PF काढण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या. नव्या सुविधेमुळे पैसे मिळवण्यासाठी बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
EPFO आपल्या 7 कोटींपेक्षा जास्त सदस्यांसाठी ही नवी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे निधी काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
नव्या व्यवस्थेनुसार PF दावा मंजूर झाल्यानंतर रक्कम UPI च्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा करता येणार आहे. त्यामुळे व्यवहार अधिक जलद होतील.
EPFO सदस्यांना ATM च्या माध्यमातूनही PF निधी मिळवण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे मिळवणे आणखी सोपे होईल.
आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25 टक्के व्याज सदस्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे PF खात्यातील बचतीत आणखी वाढ होणार आहे.
केंद्रीकृत डिजिटल प्रणालीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या अपडेटमुळे क्लेम प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.
नवी सुविधा सुरू करण्यापूर्वी EPFO सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहण्याची शक्यता असली तरी सदस्यांना यानंतर अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहेत.