Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! घरबसल्या स्वतःच बनवा 'फार्मर आयडी'; नाहीतर अडकणार पीएम किसानचा 23वा हप्ता

Rashmi Mane

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

पीएम किसानचा पुढील 23वा हप्ता 20 जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पण कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी (फार्मर रजिस्ट्री) पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

PM Kisan yojana | Sarkarnama

कार्यालयाच्या फेऱ्यांना पूर्णविराम

आता ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना सीएससी केंद्र किंवा कृषी कार्यालयात जावे लागत होते. आता सरकारने ऑनलाइन स्वयं-नोंदणीची सुविधा सुरू केल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे.

PM Kisan Yojana 21st installment

काय आहे फार्मर आयडी?

फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल ओळख. यामध्ये जमीन, पीक आणि इतर महत्त्वाची माहिती नोंदवली जाते. यामुळे शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळतो.

PM Kisan Yojana 21st installment

घरबसल्या करा नोंदणी

फार्मर रजिस्ट्री पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल नंबर वापरून खाते तयार करता येते. काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होते.

PM Kisan Yojana 21st installment

ओटीपीद्वारे होईल पडताळणी

नोंदणीदरम्यान मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी पडताळणीनंतर पासवर्ड तयार करून खाते सक्रिय करता येईल. त्यानंतर शेतकरी स्वतःची माहिती पाहू शकतात.

PM Kisan Yojana 21st installment | Sarkarnama

माहिती अपडेट करण्याची सुविधा

खाते तयार झाल्यानंतर शेतकरी स्वतःची जमीन आणि इतर माहिती तपासू शकतात. आवश्यक असल्यास त्यामध्ये बदल किंवा अद्ययावत माहितीही भरता येते.

PM Kisan Yojana 21st installment

पीएम किसान हप्ता अडकू शकतो!

सरकारच्या सूचनेनुसार फार्मर रजिस्ट्री पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

PM Kisan Yojana | sarkarnama

या योजनांसाठीही आवश्यक

खते, बियाणे, कृषी यंत्रांवरील अनुदान तसेच विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे विलंब न करता आजच नोंदणी पूर्ण करा.

PM Kisan scheme | sarkarnama

Next : घरी बसल्या मिळणार 8.2% पर्यंत व्याज! 'या' सरकारी योजनांमध्ये मिळतोय बंपर परतावा

येथे क्लिक करा