Jagdish Patil
एपस्टीन फाईल अमेरिकेत खुली होताच आपल्या देशाचा पंतप्रधान बदलला जाईल, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अशातच अमेरिकन हाऊसने जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील 68 फोटो प्रसिद्ध केलेत. ज्यामध्ये बिल गेट्स यांच्यासह गुगलचे सर्गेई ब्रिन, नोम चॉम्स्की यांचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर जगभरात गाजलेले आणि अनेक दिग्गज नेत्यांची धाकधूक वाढवणारं एपस्टीन फाईल्स प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
2008 मध्ये अल्पवयीन मुलीच्या पालकांनी फ्लोरिडातील पोलिसांकडे एपस्टीनने त्यांच्या मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
त्यानंतर 11 वर्षांनी एपस्टीनवर लैंगिक संबंधांसाठी अल्पवयीन मुलींचं नेटवर्क चालवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला.
तसंच त्याने अल्पवयीन मुलींच्या मदतीने मोठ्या राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचंही उघडकीस आलं.
या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असतानाच त्याने तुरुंगातच आत्महत्या केली. मात्र ही हत्या असल्याचा संशय आजही अनेकांना आहे.
तर एपस्टीन प्रकरण पारदर्शकता असावा यासाठी ट्रम्प यांचे समर्थक आणि त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील लोकांकडून दबाव वाढला होता.
या प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्स खुल्या करण्याबाबतच्या विधेयकावर बुधवारी सही केली आहे.
त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं असून आता अमेरिकन सभागृहात ही फाईल खुली होताच कोणकोणत्या नेत्यांची नावे समोर येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.