Jagdish Patil
CISF मध्ये आता पहिल्यांदाच महिला बटालियन पाहायला मिळणार आहे.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी गृह मंत्रालयाने ऑल-वुमेन बटालियनला मान्यता दिली आहे.
तर CISF ची स्थापना कधी आणि कशी झाली ते आज जाणून घेऊया.
भारत सरकारने 10 मार्च 1969 रोजी एका कायद्यानुसार CISF ची स्थापना केली होती.
CISF हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते ते एक केंद्रीय सशस्त्र दल आहे.
सार्वजनिक उपक्रम, औद्योगिक आणि इतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा करण्याचं हे या दलाचं प्रमुख काम आहे.
सुरुवातीला केवळ औद्योगिक सुरक्षेच्या उद्देशाने CISF ची स्थापना करण्यात आली होती.
मात्र, नंतर विमानतळ, आण्विक संस्था, दिल्ली मेट्रो आणि सरकारी इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी देखील CISF कडे सोपवली गेली.
1983 मध्ये CISF कायद्यात सुधारणा करून त्याला सशस्त्र दलाचा दर्जा देण्यात आला.