सरकारनामा ब्यूरो
अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या सोमवारी केलेल्या घोषणेमध्ये रिपब्लिकन काँग्रेस पक्षाच्या सदस्या एलिस स्टेफनिक यांची निवड अमेरिकेच्या 'राजदूत पदी' केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेफनिक यांना 'फर्स्ट फायटर' अशी उपमा दिली आहे.
एलिस यांचा जन्म न्यूयार्कमध्ये झाला आहे. त्या त्यांच्या कुटुंबांतील पहिल्या महिला आहेत ज्यांनी कॉलेजपर्यतचं शिक्षण पूर्ण केल.
2006 मध्ये त्यांनी हार्वर्ड इन्स्टीट्यूटमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळवली आहे. त्याचबरोबर येथेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स च्या उपाध्यक्ष होत्या.
11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता यानंतरच त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचं ठरवल.
2014 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्या काँग्रेसमधून निवडून येणाऱ्या पहिल्या तरुण महिला ठरल्या आहेत.
पंतप्रधान मार्गरेट थैचर यांच्यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी जॉर्ज बुश प्रशासनात देखील त्यांनी काम केलं आहे. रिपब्लिकन काँग्रेसमधून अनेक उपक्रम सुरु करुन त्यात त्यांनी सहभाग घेतला होता.