Mangesh Mahale
कार, मोटरसायकलच्या टँकमध्ये पेट्रोलसह इथेनॉलची एंट्री झाली आहे. आता हे इको-फ्रेंडली इथेनॉल लवकरच आपल्या किचनमध्येही एन्ट्री करणार आहे.
एका रिपोर्टनुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय नवीन ऑल्टरनेटिव्ह क्लीन कुकिंग पॉलिसीवर काम करत आहे.
जर भारतीय किचनमध्ये एलपीजीच्या जागी बायोगॅस आणि इतर ग्रीन फ्यूल पोहोचलं. तर 2050 पर्यंत देश 2 लाख कोटी रुपयांहून जास्त बचत करू शकतो.
सरकार पर्यायी स्वच्छ कुकिंग धोरण तयार करत आहे. या अंतर्गत एलपीजीसह इथेनॉललाही घरगुती जेवण तयार करण्याच्या रुपात प्राधान्य दिलं जाईल. हे धोरण सप्टेंबरपर्यंत तयार होऊ शकतं.
सामान्य जनतेला इथेनॉल फॅमिली स्वीकारण्यासाठी सरकार स्पेशल सबसिडी, कॅपिटल सपोर्ट किंवा नियमित आर्थिक सहाय्यता देण्यावर विचार सुरू आहे.
इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी सरकार सबसिडी, सप्लाय चेन आणि वितरण व्यवस्था तयार करण्यावर काम करतेय. इथेनॉल सप्यालशी संबंधित इंडस्ट्रीसहही या नितीवर चर्चा सुरू आहे.
इथेनॉल एक पूर्णपणे ग्रीन फ्यूल आहे. देशात इथेनॉल आधारित कुकुंग स्टोव्हची टेस्टिंग होत आहे. भारता इथेनॉलची उपलब्धता वाढत आहे.
NEXT: सुनेत्रा पवार यांच्या मोठ्या सुनबाई कायनात धार कोण? पार्थ-कायनातच्या साखरपुड्याची तारीख ठरली!