Sachin Waghmare
धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व अजित पवार गटाचे प्रा. सुरेश बिराजदार यांच्यात येत्या निवडणुकीत लढत होण्याची शक्यता आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांच्याविरोधात निवडणुकीत महायुतीकडून उमेदवार फायनल झालेला नाही.
खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडे सर्वजण पाच वर्षातील कामांचा हिशेब मागत आहेत.
भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार राजेनिंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
राजेनिंबाळकर यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते.
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही खासदारांवर टीका केली होती.
प्रा. बिराजदार यांनीही उडी घेत राजेनिंबाळकर यांनी खासदारकीच्या काळात कोणती कामे केली, याचा हिशेब मागितला.
ओमराजेंना पहिलवान तयार आहे, अशा भाषेत प्रा. बिराजदार यांनी त्यांना ललकारले आहे.