Jagdish Patil
कोलकाता आणि बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भारतात तासाला 3 महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. धक्कादायक बाब म्हणजे या केसमधील 96% पेक्षा जास्त आरोपी हे पीडितेच्या जवळचेच असतात.
अशा घटनांमध्ये 100 पैकी केवळ 27 आरोपींना शिक्षा होते, बाकीचे निर्दोष सुटतात. त्यामुळे बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत.
NCRB या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी 4 लाखांहून अधिक महिला अत्याचाराचे गुन्हे नोंदवले जातात. यात बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, अपहरण, ॲसिड हल्ल्यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद असतानाही परिस्थिती सुधारलेली नाही. कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडतात ते जाणून घेऊ.
2022 च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडल्या त्या 5,399 इतक्या तर दुसऱ्या क्रमांकावर यूपी असून येथे 3,690 गुन्ह्यांची नोंद आहे.
त्यानंतर मध्य प्रदेशात 3,029 गुन्हे तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र 2,904 गुन्हे नोंद आहेत.
हरियाणात 1,787, ओडिशा 1,464, झारखंड 1,298 छत्तीसगड 1,246 तर राजधानी दिल्लीत 1,212 आणि आसामध्ये 1,113 गुन्हांची नोंद आहे. त्यामुळे कायदा बदलला तरी परिस्थिती 'जैसे थे' असल्याचं दिसत आहे.