Pradeep Pendhare
महाराष्ट्रात सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबईत, तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. देशाचा विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे.
सायबर गुन्हेगारांनी आता 'लाडकी बहीण योजने'च्या बनावट संकेतस्थळापासून ते ‘सेक्स्टॉर्शन’ पर्यंत वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणे सुरू
मुंबईत म्हाडाच्या गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांच्या सोडतीवेळी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारे बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करून फसवणूक
राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यात दररोज शेकडोंवर सायबर गुन्हे दाखल होतात. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात गतवर्षी सायबरचे 65 हजार 893 गुन्हे दाखल झालेत.
देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये 24.4 टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणात 15 हजार 297 गुन्हे दाखल झाले आहेत.
देशात दुसऱ्या स्थानावर कर्नाटकात 12 हजार 556, तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या उत्तर प्रदेशात 10 हजार 117 गुन्हे दाखल झाले आहेत.
देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून सर्वाधिक मुंबईत तब्बल 4 हजार 700 वर गुन्हे, त्यानंतर पुणे शहर 357 आणि तिसऱ्या स्थानावर नागपूर शहरात 211 गुन्ह्यांची नोंद
सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनीच आमिषाला बळी पडू नये, हा मोठा उपाय असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.