सरकारनामा ब्यूरो
संधू यांनी सनावरच्या द लॉरेन्स स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहासात पदवी प्राप्त केली.
नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली.
संधू यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात रशियामधून केली.
कोलंबोच्या भारतीय उच्चायुक्तालयात राजकीय विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
फ्रँकफर्टमध्ये ते भारताचे महावाणिज्य दूत होते. परराष्ट्र मंत्रालयातही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयात प्रेस रिलेशन अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
वॉशिंग्टन डीसीमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी ते श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त होते.
युनायटेड स्टेट्समधील राजदूत म्हणून काम केले. तसेच संधू हे वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय मिशनमध्ये काम केलेले सर्वात अनुभवी व्यक्ती आहेत.
R