सरकारनामा ब्यूरो
2013 बॅचचे आयपीएस अधिकारी अमोद नागपुरे हे मूळचे मुंबई येथील रहिवासी आहेत.
गेली अनेक वर्षे ते भारताच्या स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर केडरमध्ये तैनात आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते तेथील बारमुल्ला जिल्ह्यात वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
राज्यातील गुन्हेगारीवर आळा घालणे तसेच तेथील क्राइम रेट कमी होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
या केडरमध्ये त्यांची मनापासून काम करण्याची इच्छा होती आणि नशिबाने त्यांना हेच केडर मिळाले.
बातम्यांमधून जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीची कल्पना आलीच होती. त्याप्रमाणे त्यांनी मनाचीही तयारी करून घेतली.
राज्यात होणारे सततचे हल्ले आणि दंगलीतून त्यांची सुटका करण्यासाठी आणि तेथे शांततामय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात.
सीआयडी विभागातही त्यांनी काम केले असल्याने त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे.
नीडरपणे केलेल्या कामगिरीसाठी त्यांना दोनदा राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
R