सरकारनामा ब्यूरो
20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचे मतदान प्रकिया पार पडली. याचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
निवडणूक निकाला आधी एक्झिट पोल येतात त्याकडे सगळ्याचंं लक्ष लागून राहिलं होत. निवडणुकीच्या निकालापूर्वी येणारा एक्झिट पोल म्हणजे काय? त्यांची सुरुवात कधी झाली. चला पाहुयात..
भारतातील दूसरी सार्वत्रिक निवडणूक 1957 साली झाली आणि त्याचं वेळी भारतात 'एक्झिट पोल'लाही सुरुवात करण्यात आली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हा एक्झिट पोल घेतला होता. परंतु या एक्झिट पोललाचा निकाल अचूक गृहीत धरला गेला नाही.
1980 मध्ये डॉ. प्रणय रॉय यांनी दुसऱ्यांदा एक्झिट पोल घेतला होता. त्यांनी सांगितलेला अंदाज अचूक ठरला. भाजप सत्तेत येत वाजपेयी पंतप्रधान बनले.
देशात झालेली 1996 च्या लोकसभेच्या निवडणूकीत एक्झिट पोलला महत्त्व देऊन दूरदर्शन वाहिनीवर एक्झिट पोलचे प्रक्षेपण करण्यात आले. या एक्झिट पोलचे अंदाज टीव्हीवर पहिल्यादाचं दाखविण्यात आले.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने हा एक्झिट पोल घेऊन सांगितल की या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. निकालानंतर तो अंदाज खरा झाला.
एक्झिट पोलला निवडणूक सर्वेक्षण असही म्हटले जाते.
सर्वेक्षणात आलेल्या माहितीच्या आधारावर अहवाल तयार करण्यात येतो. या अहवालानुसार मतदार कोणाला सपोर्ट करतो याची अंदाज घेऊन आकडेवारी दाखविली जाते.
निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोलबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वेही जारी केले जातात. ज्यामध्ये एक्झिट पोलची पद्धत काय असावी हे सांगितले जाते.