Aslam Shanedivan
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर प्रति वर्षी 20 ते 30 हजार भाविक जात असतात. यामुळे गोवा-मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते
कोकणात खासगी बस, एसटी, रेल्वेने जाता येते पण आरक्षणाची स्थिती पाहता नव्या मार्गांचा शोध लोक घेत आहेत.
पण आता चाकरमान्यांसाठी खुशखबर असून बाप्पाच्या आगमणाच्या आधीच कोकणात जाता येणार आहे. तेही स्वत:च्या कारने
यंदाच्या गणेशोत्सवासाठी रो-रो सेवेची भर पडली असून कोकणात जाताना कार घेऊन जाता येणार आहे. याआधी ट्रक वाहतूक रेल्वेकडून सुरू आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात उसळणारी गर्दी पाहता यावर्षीपासून बोटीचा पर्यायही उपलब्ध झाला असून आता 'कार ऑन ट्रेन' अशीही सुविधा सुरू झाली आहे
कोकण रेल्वेकडून 'कार ऑन ट्रेन' अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. याचे बुकिंग 21 जुलैपासून सुरू झाले आहे. जे 13 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू असेल.
'कार ऑन ट्रेन' या रो रो सेवेला कोलाड आणि वेरणा (गोवा) येथून सुरुवात होणार आहे
एका कारसह तिघांना एसी कोच अथवा एसएलआर डब्यातून प्रवास करता येणार असून 7 हजार 875 रूपये मोजावे लागणार आहेत.