Rashmi Mane
देवेन भारती यांचा जन्म बिहारमध्ये झाला, पण त्यांनी आपली संपूर्ण पोलिसी कारकीर्द महाराष्ट्रात घडवली.
देवेन भारती हे 1994 च्या IPS बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
ते मुंबई पोलीस दलातील गुप्तचर शाखेचे (Intelligence Unit) प्रमुखही होते. त्यांनी अनेक मोठ्या खटल्यांची यशस्वी उकल केली.
2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही देवेन भारती यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांचा पोलिस दलात धडाडीचा आणि परिणामकारक अधिकारी म्हणून लौकिक आहे. गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेण्यात ते प्रसिद्ध आहेत.
माजी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवेन भारती यांच्यावर विशेष विश्वास असल्याचे सांगितले जाते.