PM Vidyalakshmi Yojana : उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण? ही योजना देईल आधार; मिळवा 10 लाखांचं कर्ज, जाणून घ्या पात्रता

Rashmi Mane

'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना'

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना'!

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

शिक्षणाचा हक्का

"प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना – शिक्षणासाठी सरकारकडून 10 लाखांचे कर्ज!"

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

कशासाठी आहे योजना?

या योजनेतून विद्यार्थ्यांना कमी व्याजदराने शिक्षणासाठी कर्ज मिळते. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मोठा आधार!

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

किती कर्ज मिळेल?

या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे शिक्षण कर्ज मिळू शकते – तेही कोणत्याही गॅरंटीशिवाय!

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

व्याज आणि परतफेडीचे नियम

  • 4.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न: व्याज नाही

  • 4.5 – 8 लाख उत्पन्न: 3% व्याज सवलत

  • परतफेडीचा कालावधी: 15 वर्षे

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

पात्रता काय?

देशातील टॉप 860 शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश असावा. 10वी व 12 वी उत्तीर्ण असावे. वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणाऱ्यांना या योजनेचा लाभ.

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • रहिवासी व उत्पन्नाचा पुरावा

  • 10 वी, 12 वी मार्कशीट

  • प्रवेश पत्र व फॉर्म

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

अर्ज कसा कराल?

  1. पोर्टलवर जा: https://pmvidyalaxmi.co.in

  2. Student Login - नवीन खाते तयार करा.

  3. 'Apply for Education Loan' वर क्लिक करा.

  4. फॉर्म व कागदपत्रे अपलोड करा.

PM Vidyalakshmi Yojana | Sarkarnama

Next : 45 किलो सोन्याने सजलेलं अयोध्या राम मंदिर, सोन्याची आजची किंमत किती? 

येथे क्लिक करा