Ganesh Sonawane
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता राज्यातील पाचही ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी होणार आहे. या विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ज्योतिर्लिंगांसाठी नियुक्त वरिष्ठ (IAS) अधिकारी पुढीलप्रमाणे असणार आहेत-
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी.
वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय.
वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज.