Rashmi Mane
जम्मू-कश्मीरच्या अंबिका रैना यांचं स्वप्न होतं UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याचं. दोन अपयशानंतरही त्या डगमगल्या नाहीत आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश.
अंबिकाने अहमदाबादच्या CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर त्यांना स्विट्झर्लंडमधील एका कंपनीत इंटर्नशिपची संधी मिळाली होती.
सिव्हिल सेवा हेच आपलं अंतिम लक्ष्य असल्यामुळे अंबिकाने स्विट्झर्लंडची नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला हाच तिच्यासाठी ठरला टर्निंग पॉइंट!
पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अंबिकाला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र त्यांनी न थांबता आपल्या चुका शोधल्या आणि नवीन रणनीतीसह तयारी सुरू ठेवली.
सुरुवातीला ती मॉक टेस्टकडे दुर्लक्ष करत होती. पण अपयशानंतर तिला जाणवलं की मॉक टेस्टमुळे 70% तयारी व्यवस्थित करता येते आणि हेच तिच्या यशाचं गमक ठरलं.
तीन प्रयत्नांतून तिसऱ्या प्रयत्नात अंबिकाने UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आणि 164वी रँक मिळवून आईएएएस अधिकारी बनली.
अंबिकाचे वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. देशसेवेचा वारसा तिने पुढे चालवत UPSC परीक्षेसाठी समर्पित जीवन स्वीकारलं.
प्रत्येक अपयशानंतर अंबिकाने आत्मपरीक्षण केलं, चुका सुधारल्या आणि आपली रणनीती अधिक चांगली केली.