Fadnavis Government: फडणवीस सरकारचं मोठं यश; विरोधकांच्या पाठिंब्यासह 'लाडक्या बहिणीं'साठी घेतला अभिमानास्पद निर्णय,लाखो महिलांना मिळणार लाभ

Deepak Kulkarni

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला मंजूर

राज्यातील महायुती सरकारने यावेळी पावसाळी अधिवेशनात मांडलेलं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 ला मंजूर झाले आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

विरोधकांचाही पाठिंबा

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या सभागृहात शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

नवी ओळख मिळणार

फडणवीस सरकारनं मांडलेल्या या विधेयकामुळे राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना कागदोपत्री शेतकरी महिला ही नवी ओळख मिळणार आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

तरतुदी

सरकारच्या या नव्या विधेयकात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

ही अडचण दूर होणार

यापूर्वी महिलांच्या नावावर शेतजमीन नसल्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येत नव्हता. आता या नव्या विधेयकामुळे ही अडचण दूर होणार आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

निधीचीही तरतूद

महायुती सरकारच्या या महिला सक्षमीकरण विधेयकात राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधीचीही तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

शेतकरी म्हणून मान्यता

विशेष म्हणजे या विधेयकामुळे मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

स्वतंत्र ओळखपत्र

राज्य सरकारकडून या विधेयकांतंर्गत राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

सरकारचा हेतू

या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा सरकारचा हेतू आहे.

Maharashtra government Women Farmers Empowerment bill 2026 | Sarkarnama

NEXT: केंद्र सरकारचा कडक निर्णय! आता खासदारांना राहावं लागणार सरकारी गेस्ट हाउसमध्ये; नवे नियम लागू

Central Government Parliamentary committee travel guidelines | Sarkarnama
येथे क्लिक करा...