Aslam Shanedivan
केंद्र सरकारच्या संसदीय समित्यांच्या दौऱ्यांच्या दरम्यान अमाप खर्च होत असल्याबाबत अनेकदा चर्चा होतात.
आता कॅगने आपल्या अहवालात समित्यांच्या दौऱ्यांदरम्यान खासदारांवरील खर्चाचा मोठा भाग किरकोळ खर्च म्हणून दाखवला जात असल्याचे म्हटले आहे.
शिवाय, या खर्चाची कोणतीही ठोस नोंद किंवा पावत्या नसल्याचा ठपका ठेवला आहे.
यानंतर मोदी सरकारने आता काटकसर करून खर्च करण्याचे धोरण स्वीकारले असून संसदीय समित्यांच्या दौऱ्यांवर होणारा अमाप खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच खर्चात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय घेत खासदारांसोबत दौऱ्यांतील अधिकाऱ्यांची संख्या कमी करून पैसे वाचविले जाणार आहेत.
नव्या निर्णयानुसार आता खासदारांसोबत फक्त तीन ते पाच अधिकारी जाऊ शकतील. तर निर्धारित मर्यादेपेक्षा एखाद्या अधिकाऱ्याने अधिक खर्च केल्यास त्याला जबाबदार धरून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाईल.
तर खासदारांना पंचतारांकित हॉटेलऐवजी सरकारी गेस्ट हाऊस, सर्किट हाउस किंवा बजेट हॉटेलमध्ये थांबावे लागणार आहे. तर जेवण आणि पेयांवरील खर्चाचीसुद्धा मर्यादा पाळावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.