सरकारनामा ब्यूरो
UPSC परीक्षेत अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा तयारी करीत यशाचे शिखर गाठणारे मोजकेच असतात, त्यापैकी एक आहे महक जैन.
महक या मूळच्या फरीदाबाद येथील असून वडील मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. बहीण सीए आहेत.
त्यांनी दिल्ली येथील हंसराज कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून डिग्री मिळवली.
जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीतून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.
मास्टर्स करत असताना त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आहे. दोन वेळेला अपयशाचा सामना करावा लागला.
खचून न जाता पुन्हा परीक्षेची तयारी सुरु केली. रोज जुने सराव पेपर सोडवत तयारी केली.
महक यांनी 2021 ला UPSCची परीक्षा उत्तीर्ण करीत 17 वी रँक मिळवली.
रँकनुसार त्यांची नियुक्ती IASअधिकारी म्हणून करण्यात आली. त्यांचं पहिलं पोस्टिंग गुजरातला झाले
NEXT: सैफ अली खान हल्ला प्रकरणात 'या' एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्यांची हिस्ट्री