Jagdish Patil
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे.
हाय प्रोफाईल व्यक्तीच्या घरात घुसून हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलिस करत आहेत.
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून त्यांच्या पथकाचं नेतृत्व दया नायक करत आहेत.
दया नायक हे मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत.
चकमकींमध्ये गुंडांचा एन्काउंटर करणाऱ्या दया नायक यांचं मागील वर्षी प्रमोशन झालं आहे.
1995 च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेल्या नायक यांनी अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे.
त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (ATS) 3 वर्षे काम केलं आहे.
1996 मध्ये जुहू ते पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त झाले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नेटवर्क नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रिपोर्ट्सनुसार, दया नायक यांनी 80 हून अधिक गुन्हेगारांचा एन्काउंटर केले असून सध्या ते या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे.