Fali S Nariman Death : 'घोडे तरी प्रामाणिक, त्यांचा अपमान करू नका!' घोडेबाजारावरून राजकारण्यांचे कान उपटणारे प्रख्यात वकील...

Rashmi Mane

फली एस नरिमन

भारतातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनुभवी वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

fali s nariman | Sarkarnama

न्यायालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव

दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नरिमन यांना वकील म्हणून 70 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता.

fali s nariman | Sarkarnama

मुंबई उच्च न्यायालय

फली एस नरिमन यांची मुंबई उच्च न्यायालयात नोव्हेंबर 1950 मध्ये वकील म्हणून नोंदणी झाली.

fali s nariman | Sarkarnama

ज्येष्ठ वकिलाचा दर्जा

नरिमन यांना 1961 मध्ये ज्येष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला.

fali s nariman | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस

मुंबई उच्च न्यायालयानंतर नरिमन यांनी 1972 मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.

fali s nariman | Sarkarnama

सॉलिसिटर जनरल

मे 1972 मध्ये त्यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

fali s nariman | Sarkarnama

पद्मभूषण पुरस्काराने सन्मामित

फली एस नरिमन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

fali s nariman | Sarkarnama

बार असोसिएशनचे अध्यक्ष

ज्येष्ठ वकील असण्यासोबतच ते 1991 ते 2010 या काळात बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते.

fali s nariman | Sarkarnama

इंटरनॅशनल चेंबरचे उपाध्यक्ष

नरिमन हे 1989 ते 2005 पर्यंत इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे उपाध्यक्षदेखील होते.

fali s nariman | Sarkarnama

हॉर्स ट्रेडिंग

90 च्या दशकात देशात खासदार-आमदारांच्या घोडेबाजाराची म्हणजेच हॉर्स ट्रेडिंगची प्रकरणे समोर आली होती. फली एस नरिमन यांनी खासदार आणि आमदारांना घोडे तरी प्रामाणिक आहेत. हॉर्स ट्रेडिंगला संदर्भ देण्यासाठी घोडे बाजाराला हा शब्द वापरणे म्हणजे घोड्यांचा अपमान आहे, असे मत नरिमन यांनी व्यक्त केले होते.

R

fali s nariman | Sarkarnama

Next : छत्रपती घराण्याचे वारसदार ते कोल्हापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार...

येथे क्लिक करा