Rajanand More
दक्षिण भारतात मागील काही महिन्यांत बहिणींनी भावाविरोधात राजकीय बंड केल्याचे दोन घटना घडल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांभोवती हे राजकारण फिरत आहे.
भारत राष्ट्र समितीतून निलंबित करण्यात आलेल्या के. कविता यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत वादानंतर त्यांना काही महिन्यांपूर्वीच पक्षाने निलंबित केले होते.
तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनाच पक्षात बाहेर पडावे लागल्याने राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
कविता यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांची राजकीय लढाई भावाविरोधातच राहणार असल्याची चर्चा आहे.
के. कविता यांनी त्यांचे बंधू केटीआर यांच्यासह अन्य नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. केसीआर यांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन झाले होते.
कविता यांनी बीआरएसमधून निलंबन झाल्यानंतर लगेच तेलंगणा जागृती समितीची स्थापना केली होती. त्याचवेळी त्यांच्या स्वतंत्र राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली होती.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या वायएस शर्मिला यांनीही तेलंगणामध्ये स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. त्यांनी बंधू माजी मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याविरोधात मोहिम उघडली होती.
सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात शर्मिला या काँग्रेसमध्ये आहेत. तर जगनमोहन यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने विरोधकाच्या भूमिकेत आहेत.