काँग्रेसचा एकही आमदार नसलेल्या राज्यात भाजपला टक्कर देणाऱ्या खासदाराचा पक्षप्रवेश; ताकद वाढली...

Rajanand More

मौसम नूर

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार मौसम नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Mausam Noor | Sarkarnama

ममतांना धक्का

बंगालमधील पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधीच नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे.

Mausam Noor | Sarkarnama

राज्यसभा खासदार

नूर या राज्यसभेच्या खासदार आहेत. २०२० मध्ये त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली होती. येत्या एप्रिलमध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या आता राजीनामा देणार आहेत.

Mausam Noor | Sarkarnama

काँग्रेसची ताकद वाढली

नूर यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढली आहे. प्रामुख्याने मालदा भागासह परिसरामध्ये पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.

Mausam Noor | Sarkarnama

दोनदा लोकसभेत

मौसम नूर या मालदा उत्तर मतदारसंघाच्या दोनदा खासदारही होत्या. हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे.

Mausam Noor | Sarkarnama

पराभव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. पुन्हा निवडणूक लढविली. मात्र भाजप उमेदवाराकडून पराभव.

Mausam Noor | Sarkarnama

एकही आमदार नाही

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता.

Congress | Sarkarnama

तृणमूलला टक्कर

काँग्रेसने नूर यांना पक्षात घेत थेट ममतादीदींना आव्हान दिले आहे. नूर यांनीही राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी ताकद लावणार असल्याचे म्हटले आहे.

Mausam Noor | Sarkarnama

NEXT : मंत्र्यांच्या बैठकीतच आमदाराला हृदयविकाराचा झटका; काल वाढदिवस साजरा, आज निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा.