Jagdish Patil
देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी (ता.5 डिसेंबर) तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
CM पदासाठी फडणवीसांचे नाव जाहीर होताच त्यांच्या जुन्या घोषणा आणि वक्तव्य व्हायरल होत आहेत.
यामध्ये 'मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊँगा!' या शेरोशायरीचा समावेश आहे.
'मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, 'माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मी पुन्हा येईन'
"मला माझ्या बहिणींनी 'देवाभाऊ' अशी साद घातलेली जास्त आवडते!" असं म्हटलेलं वक्तव्य देखील व्हायरल होत आहे.
एका मुलाखतीत 'तुम्हाला राज्यात खुर्ची कंफर्टेबल आहे का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'राजकारण्यांना फक्त खुर्ची पाहिजे कम्फर्ट ते स्वत: शोधतात.' हे दिलेलं उत्तरही सध्या चर्चेत आहे.
तसंच ‘बटेंगे तो कटेंगे’, एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही घोषणा देतानाचे त्यांचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्याचप्रमाणे "मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज."
"मला बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करायचं आहे." अशी फडणवीसांनी केलेली वक्तव्य व्हायरल होत आहेत.