सरकारनामा ब्यूरो
दुर्गा या मूळच्या छत्तीसगढ राज्यातील आहेत. त्यांचे वडील भारतीय सांख्यिकी सेवा मध्ये अधिकारी होते आणि आजोबा पोलिस अधिकारी होते.
दुर्गा यांनी 'इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल यूनिवर्सिटी' मधून B. Tech पूर्ण केले. त्यानंतर लगेचच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागल्या.
2008 मध्ये IRS मध्ये निवड आणि 2010 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडियात 20 व्या रँकने झाल्या IAS अधिकारी.
2013 मध्ये नोएडा येथे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) असताना त्यांनी जीव धोक्यात घालून यूपीच्या वाळू माफियांशी निर्भयपणे मुकाबला केला होता.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी दुर्गा यांनी मध्यरात्री छापे टाकले. रोज पहाटे 2-3 वाजेपर्यंत त्या त्यांच्या आरमारासह या भागांवर लक्ष ठेवत असत.
एका गावात बांधकाम सुरू असलेल्या मशिदीची भिंत पाडल्याचा आरोप करून त्यांना 2013 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
सध्या त्यांना उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्त केले आहे.